अजानला परवानगी कशी दिली? शिवसेना-भाजपने प्रशासनाला केला सवाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  रमजानच्या काळात अजानला परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढू शकतो. काही समाजातील सण घरात साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा नगर शहरातील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा यांच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आपण व पोलीस यंत्रणा, महानगरपालिका प्रशासन यांनी जे काम केले ते प्रशांसकीय आहे.

परंतु काही विशिष्ट समुहामुळे नगर शहर रेड झोनमध्ये गेले आहे. दि.28 एप्रिल रोजी अजान सांगण्यासाठी आपण परवानगी दिली. नगरमध्ये आलीकडे अनेक धार्मिक सण होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने हनुमान जयंती, श्रीराम नवमी, इस्टरसंडे, महावीर जयंती उत्सव झाले.

सर्वानी संयम बाळगून सण घरामध्येच साजरा केला. असे असताना आपण मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध घातलेले आहे. हा न्यायालयाचा अवमान होऊ शकतो असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24