पुणे :- महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.
दरम्यान गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता.
राज्यात 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली. दहावी आणि बारावीचे निकाल mahresult.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.