अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जानेवारी सुरू झाल्याझाल्या हुरडा पार्टीचा हंगाम सुरू झाला असं समजायचे.
थंडीचा मौसम सुरू झाल्यानंतर खास हुरडय़ाची गावरान चव आणि चुलीवरच्या जेवणाची लज्जत अनुभवण्यासाठी अनेक शहरी पावले गावाकडे तिकडे मोठय़ा संख्येने वळताना दिसत आहेत.
नुकतेच नगरजवळील अनेक ठिकाणी सध्या हुरडा पार्ट्या रंगत आहेत शहराची गर्दी आणि धकाधकीच्या वातावरणातून शहरवासीय गावाकडे, कृषी पर्यटन केंद्रकडे किंवा हुरडाची ठिकाणे शोधतात.
थंडीची चाहूल लागली की हुरडा पार्टीची चर्चा रंगते. कोविड मुळे यावर्षी हि संख्या कमी झाली असली तरी लोकांचा उत्साह आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा थंडी जोर धरू लागली आहे.
आणि थंडी म्हटली की गेल्या काही वर्षांपासून ‘हुरडा पार्टी’चे वेध लागलेले दिसतात. ज्वारीची कोवळी कणसं जरा जोमात आली की या हुरडा पाटर्य़ांचे पेव फुटलेले दिसते.
दरम्यान ‘हुरडा पार्टी’ ची सुरुवात झाली खरं तर अगदी कौटुंबिक स्तरावर. पण हळूहळू त्याला आता संपूर्ण व्यावसायिक स्वरूप आलेले आहे.
धावपळीच्या युगात अगदीच दिवस काढून जाणे शक्य नसेल तर आता हुरडा खाण्याची हौस भागवण्यासाठी इन्स्टंट हुरडा देण्याची व्यवस्थाही काही मार्गांवर सुरू झाल्याचे दिसते.
पुणे-नगर मार्गावर भाजी-फळे विक्रीसाठी जशा हातगाडय़ा लावतात त्यानुसार गाडय़ा लावून गरमागरम हुरडा गाडीतच खाण्यासही दिला जाऊ लागला आहे.