तुमचं मूल खूपच उत्साही असेल तर हे नक्की वाचा असू शकतो हा आजार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अनेकदा आपलं मूल खूपच उत्साही असल्याचं पालकांना वाटतं; पण प्रत्यक्षात हायपोमेनिया नावाच्या विकारामुळे ही समस्या निर्माण होते. प्रौढांमध्येही ही समस्या जाणवू शकते.

लहान मुलं खूप खोड्या करायला लागली किंवा गोंधळ घालायला लागली, तर साहजिकच आपण त्यांना ओरडतो; पण कदाचित त्यांना हायपोमेनिया हा विकारही असू शकतो. आहे. सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये ही समस्या आढळते.

म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत हायपोमेनियाची लक्षणं,मेनिया आणि हायपोमेनिया म्हणजे काय ?हायपोमेनिया होण्याची कारणे,इत्यादी महत्वाची माहिती.

ही आहेत हायपोमेनियाची लक्षणं –

तसे सांगायचे झाल्यासच  सर्व वयोगटांमध्ये हायपोमेनियाची सर्वसाधारण लक्षणं जाणवतात. अचानक मूड बदलणं, व्यक्तीमध्ये खूप उत्साह संचारणं, दिवसातला जास्तीत जास्त वेळ खेळण्यात किंवा कामात घालवणं, एका जागी बसून काम करण्यात अडचणी येणं, झोपेत अडथळे येणं, सतत झोपमोड होणं, अतिआत्मविश्वास निर्माण होणं, उगाचच प्रौढी मिरवणं, सतत बडबड करत राहाणं, गरजेपेक्षा जास्त बोलणं, खूप राग येणं, लहानसहान गोष्टींमुळे चिडचिड होणं, एकाग्रता कमी होणं, 

मेनिया आणि हायपोमेनिया म्हणजे काय ?

मेनिया आणि हायपोमेनिया असे दोन विकार आहेत. मेनियामध्ये वरील लक्षणांची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते, तर हायपोमेनिया हा मेनियाचा तुलनेने सौम्य असा प्रकार आहे. मेनिया किंवा हायपोमेनिया जडलेल्या व्यक्तीला आपल्यातली ही लक्षणं पटकन लक्षात येत नाहीत. मात्र त्यांच्यातले हे बदल इतरांच्या अगदी सहज लक्षात येतात. हे बदल लक्षात आणून दिल्यानंतर रुग्ण त्यावर विश्वास ठेवत नाही. मेनिया आणि हायपोमेनिया बायपोलर डिसऑर्डरचाच भाग आहेत. बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं कारण माहीत नसलं, तरी यामागे अनुवांशिक कारणं असू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

या कारणामुळे होतो हायपोमेनिया :-

मेंदूतल्या रासायनिक असंतुलनामुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते. लहान मुलांमधल्या हायपोमेनियामध्ये काही लक्षणं जाणवू शकतात. पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हा विकार झाल्यानंतर मुलं गरजेपेक्षा जास्त बोलतात. सतत बडबड करतात. त्यांना सतत बोलावंसं वाटतं. आपलं मूल बडबडं आहे, असं वाटून पालक त्याकडे दुर्लक्ष करतात; पण, प्रत्यक्षात हे हायपोमेनियाचं लक्षणं असू शकतं.

..म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करू नका

ही मुलं वयाला न शोभणारी कामं करू लागतात. मात्र पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. त्याला समजून घेऊन वागायला हवं. मुलांच्या समस्या समजून घ्या. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐका. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि औषधोपचारांनी हा विकार नियंत्रणात राहू शकतो. तसंच आपल्या पाल्याची नीट काळजी घेणं गरजेचं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24