महाराष्ट्र

Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai SUV, स्टायलिश लूकसह मिळतील जबरदस्त सेफ्टी फीचर्स

Hyundai Exter : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होत आहेत. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात एक नवीन कार आगमन करणार आहे. ही कार थेट टाटा पंचला टक्कर देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार Hyundai लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मायक्रो एसयूव्ही एक्स्टर लॉन्च करू शकते. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळणार आहे.

एवढेच नाही तर कंपनी या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते कंपनीची ही कार टाटा पंचलाही थेट टक्कर देऊ शकेल. तसेच, त्याची किंमत देखील खूप कमी ठेवली जाऊ शकते.

Hyundai Exter Powertrain

नवीन Hyundai Xeter मध्ये कंपनी 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 83 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यासोबतच 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.2 लीटर इंजिनसह CNG पॉवरट्रेनचा पर्यायही मिळू शकतो. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटीचा पर्याय मिळू शकतो.

Hyundai Exter Price

आतापर्यंत कंपनीने या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. पण असे मानले जात आहे की कंपनी याला बाजारात 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करू शकते.

म्हणूनच जर तुम्हालाही चांगली कार घ्यायची असेल, तर ही आगामी Hyundai कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तसेच या कारचा लूक देखील अतिशय स्टायलिश असणार आहे. यासोबतच कंपनी जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह 6 एअरबॅग देखील देऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts