Tata Punch : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी ‘Hyundai’ आणत आहे नवीन छोटी SUV, जाणून फीचर्स

Tata Punch : टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी Hyundai India नवीन सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करू शकते. एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, Hyundai भारतीय बाजारपेठेसाठी ही नवीन एंट्री-लेव्हल SUV तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ही SUV 2023 च्या मध्यात म्हणजेच सणासुदीच्या आसपास लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाला Hyundai Ai3 CUV (कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल) असेही म्हंटले जात आहे.

नवीन एंट्री-SUV Hyundai Grand i10 Nios प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ह्युंदाईने गेल्या वर्षी दक्षिण कोरियामध्ये नवीन Casper micro SUV लाँच केली होती. ही छोटी एसयूव्ही देखील ग्रँड i10 प्लॅटफॉर्मवर डिझाइन आणि विकसित केली गेली आहे. सध्याची रचना वापरल्याने Hyundai ला नवीन मायक्रो SUV ची किंमत कमी ठेवण्यास मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Hyundai ची नवीन कॉम्पॅक्ट SUV

नवीन Hyundai Casper वर आधारित छोटी SUV टाटा पंच, Renault Kiger आणि Nissan Magnite ला टक्कर देईल. नवीन मॉडेल कॅस्परपेक्षा थोडे मोठे असेल. Hyundai ग्रँड i10 Nios आणि व्हेन्यू कॉम्पॅक्ट SUV साठी नवीन सब-4 मीटर SUV SUV सामावून घेण्यासाठी व्हेरियंट लाइन-अपमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, Hyundai दरवर्षी या मॉडेलचे 50,000 युनिट्स तयार करण्याची योजना आखत आहे. खरं तर, Hyundai Motor India ने गेल्या आर्थिक वर्षात 7.7 लाखांवरून 8.5 लाख युनिट्सपर्यंत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 1,470 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

नवीन Hyundai SUV ग्रँड i10 Nios आणि Venue कॉम्पॅक्ट SUV सोबत इंटीरियर आणि वैशिष्ट्ये शेअर करेल अशी अपेक्षा आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक एसी इत्यादी वैशिष्ट्यांसह येण्याची शक्यता आहे.

New Hyundai Casper

नवीन Hyundai SUV मध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे जी Grand i10 Nios, Venue, Aura आणि i20 ला शक्ती देते. हे इंजिन 82bhp आणि 114Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT समाविष्ट होण्याची शक्यता आहे. सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीला सीएनजीचा पर्यायही मिळू शकतो.