मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही – आमदार राम शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आ. शिंदे म्हणाले, आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विखे व खासदार सुजय विखे यांनी मदत केली नाही म्हणून आ. शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या दौऱ्यात विखे व शिंदे यांना आपल्या शेजारी बसवून या दोघांमधील वाद चहाच्या पेल्यातील आहे, वाद आहेत पण ते वादळ नाही, असे भाष्य करीत दोघांमधील वाद मिटल्याचे जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर आ. शिंदे यांनी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती माध्यमांना दिली व त्यावेळी आपली भूमिका मांडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संदर्भात वस्तुस्थिती व वस्तुनिष्ठ जे होते,

ते मी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते. त्यावर विखेंकडून काही प्रत्युत्तर आले नाही म्हणजे मी केलेला दावा खरा होता, परंतु श्रेष्ठींनी मला सांगितल्याने मी याआधी दोनदा थांबलो आहे व आताही थांबत आहे, असे सूचक भाष्य भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी येथे केले.

दरम्यान, राधाकृष्ण विखे हे सीनियर पालकमंत्री आहेत. त्यांनी माझी जबाबदारी घेतल्याचे जाहीर करणे, याचे मी स्वागत करतो, असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले. आ. शिंदे म्हणाले, आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत.

भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच. राज्याच्या नेतृत्वाने सांगितल्यावर मी दोन पावले मागे आलो आहे,

भविष्यात तेही दोन पावले मागे येतील. भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळतोच, त्यांची गळचेपी होत नाही. मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही. मी लढवय्या आहे, परंतु भविष्यात असे प्रसंग येणार नाहीत, याची खबरदारी सर्वच जण घेतील अशी आशाही आ. शिंदे यांनी व्यक्त केली.