अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन थंडीत पावसाने जोर धरला आहे. यातच या अवकाळी पावसाबद्दल सोशल मीडियात विनोदाने पोस्ट केल्या जात आहेत.
अशीच एक गंमतशीर पोस्ट एका राजकीय नेत्याने पोस्ट केली आणि यापोस्टची चर्चासर्वत्र होऊ लागली आहे. दरम्यान हि राजकीय व्यक्ती दुसरी कोणी नसून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे आहे.
तांबे यांनी ‘दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…’ असे ट्वीट करून #मोदीहैतोमुमकिनहै असा हॅश टॅग देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
अनेकांना त्यांची ही गमतीदार राजकीय संदर्भ असलेली पोस्ट आवडली. अनेक सरकारी कंपन्यांची होत असलेली विक्री, खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून मोदींवर टीका केली जाते.
सध्याच्या वातावरणातून केल्या जाणाऱ्या गंमतीचा आधार घेत त्याच भाषेत अशी टीका करण्याचा प्रयत्न तांबे यांनी केल्याचे दिसून येते. अनेकांनी लाईक करून आपली मतेही नोंदविली आहेत.