डेटिंग साइटवरील झाली महिलेशी ओळख, आणि अभियंत्याची झाली ३७ लाखांची फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  डेटिंग साइटवर ओळख झालेल्या महिलेने एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत संगणक अभियंत्याची तब्बल ३७ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी मोबाइलधारक व्यक्ती व विविध बँकांच्या खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी येथील इवॉन आयटी पार्क येथील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एका डेटिंग सोशल अॅपवर खाते आहे. त्यातून त्यांची एका महिलेशी ओळख झाली. तिने आपण लंडनमधील लॉइड बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादीशी ओळख वाढली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. संबंधित महिलेने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून तो व्यवसायासाठी गुंतवायचा असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर फिर्यादीस महिलेने दिल्लीस बोलावले.

त्यानंतरही पैशाची मागणी वाढू लागली. सातत्याने होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे फिर्यादीस संशय आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24