Maharashtra News : राज्यात गेली अनेक महिन्यापासून मराठा समाज बांधवानी आपल्याला हक्काचे व टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून लढा सुरु ठेवला असून, या लढ्यामध्ये त्यांनी ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवे आहे.
ही मागणी त्यांनी कायम ठेवली असल्याने शासनाने या बाबत तात्काळ निर्णय घ्यावा. व ओबीसीतून आरक्षण देऊ नये. जर तसे झाले तर येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी गावातीलच स्मशानभूमीमध्ये सरण रचून सरणावरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
असा गर्भित इशारा शेवगाव तालुक्यातील प्रभुवाडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भिमराव बटूळे यांनी तहसीलदारांना दिला आहे.
निवेदनामध्ये नमूद केले आहे की, राज्यात गेली अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढाई सुरु आहे. मात्र मिळणारे आरक्षण ओबीसीतूनच मिळावे ही मागणी योग्य नसून शासनावर एक प्रकारे दबाव आणण्याचाच प्रयत्न सुरु असल्याने
ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातल्यास ते चुकीचे व ओबीसी समाज बांधवांना विचार करणारे असेल तरी शासनाने या बाबत विचार करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवाना आरक्षण देण्यात यावे.
जर ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर मात्र प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातीलच स्मशानभूमीत सहकाऱ्यंसमवेत सरणावर बसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे म्हटले आहे.