महाराष्ट्र शासनामार्फत ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ शालेय शिक्षण (पहिली ते बारावी) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात 26 ऑक्टोबर 2012 साली झालेली आहे.
ही योजना विद्यार्थ्यांसाठी असून या योजनेंतर्गत इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे जी हानी होईल त्याची नुकसान भरपाई काही प्रमाणात दिली जाते. यामध्ये मृत्यू झाल्यास तसेच कायमचे अपंगत्व आल्यास साधारण ७५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.
अपघात झालेल्या विद्यार्थ्यास या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे लाभ मिळतील.
१) विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास – रु. १,५०,०००/-,
२) अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास (दोन अवयव / दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) – रु. १,००,०००/-,
३) अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास (एक अवयव किंवा एक डोळा निकामी) – रु. ७५,०००/-,
४) अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास रु. १,००,०००/-
अर्ज कसा करावा ?
अपघात झाल्यानंतर दाव्यासाठी पालकाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत / प्राचार्यांमार्फत विहित नमुन्यात पहिली ते आठवीसाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) व नववी ते बारावीसाठी शिक्षणाधिकारी (मा.) यांच्याकडे तीन प्रतींमध्ये अर्ज करावेत.
प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?
प्रस्तावासोबत काही कदपत्रे देखील सादर करावी लागतात. यामध्ये प्रथम खबरदारी अहवाल, स्थळ पंचनामा यांचा समावेश आहे.
सोबतच इन्व्हेस्ट पंचनामा, सिव्हिल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला हे देखील कागदपत्रे यासोबत लागतात.