आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार एका एकाला; शिवसेना नेते बरसले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये ईडी vs महाविकास आघाडी हा संघर्ष पाहायला मिळतो आहे.

महाविकास आघाडीमधील काही नेत्यांची ईडीने चौकशी लावली आहे. ईडी हि संस्था भाजपासाठी काम करत आहे असा आरोप महाविकास आघाडी मधील नेते वारंवार करत आहे.

सध्या ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी लावली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदे मध्ये खासदार संजय राऊत बोलत होते.

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी बेताल वतव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर हल्ला बोल केला आहे. संजय राऊत म्हणाले,

काहीही कागद फडकावतात आणि आरोप करतात. आम्हाला काय मूर्ख समजले आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. आम्ही फक्त सध्या शांत आहोत.

हिम्मत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावे .आरोप सिद्ध झाले तर तर अब्रूनुकसानीचे खटले वगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल,

पण जर आरोप सिद्ध झाले नाही तर आरोप करणार्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारले नाही तर माझे नाव संजय राऊत नाही हे मी या आधीच सांगितले आहे. असे राऊत यांनी स्प्ष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24