अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
राज्य सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी.
या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती.
आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्राचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढील दौऱ्यावर जाण्याआधी
त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही पुरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली. रामपूर गावात त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली.
नागरिकांना तातडीने मदत करावी, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. ठाकरे म्हणाले, “आताही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. सुदैवाने आज उघडीप आहे.
सर्व जनतेला दिलासा देतो आहोत. प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे. पाऊस पुन्हा येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे.
मात्र, जी परिस्थिती उद्भवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. पंचनामे सुरु आहेत. माहिती घेत आहोत.
मदतीला सुरुवातही केली आहे. आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही. आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved