सरकारने लाईट बिल कमी केलं नाही तर भाजप राज्यात मोठं आंदोलन करेल – चंद्रकांत पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने लाईट बिल कमी केलं नाही तर भाजप राज्यात मोठं आंदोलन उभं करेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी वाघोली येते झालेल्या मेळाव्यात दिलाय पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम (भैय्या) देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित वाघोली येथे बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये भाजप आमदार जास्तीत जास्त कसे निवडून आणता येईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे चंद्रकांत दादा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.जयसिंग गायकवाड यांना पक्षानी खूप दिलं मात्र ते गेले.

लाईट बिल बाबत मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे. मुलीवर अन्याय अत्याचार सुरू आहेत त्यावर सरकार काही बोलत नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24