“चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस प्रशासनाकडूनच जेव्हा नागरिकांची हेळसांड केली जाते तेव्हा न्यायासाठी कोणाचे दार ठोठवायचे हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.

पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अधिक नागरिक भयभीत झाले आहे. वर्षाचा सणउत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, खरवंडी कासार येथील व्यावसायिक अशोक खेडकर यांच्या मोबाईल शाॅपी व इलेक्ट्रॉनिक दुकानाचा वरील पञा तोडून

दुकानातील विविध नामांकीत कंपन्याचे मोबाईल तसेच महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याला चोरीची माहिती दुकानदार खेडकर यांनी कळवले असता,

“चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का” असे दूरध्वनीवरून कळवले. सर्वसामान्य जनतेला जर अशी उत्तरे पोलीस प्रशासनाकडून मिळणार मिळत असतील तर

चोरी, दरोडा, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा तपास कसे लागणार असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे खरवंडी कासार येथील

पोलीस दुरक्षेञ चौकी कायमस्वरूपी चालु ठेउन एक पोलीस उपनिरीक्षक व चार पोलीस काॅन्स्टेंबल ठेवण्याची मागणी खरवंडी कासार येथील नागरिक, व्यवसायिक करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24