अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असून रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे,याबाबत बोलताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.
मंत्र्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. त्यामुळे अनलॉक काय करावं हे त्यांना कळेना झालं आहे. राज्यातील मंत्रीच लॉक झाले आहेत आणि जनता अनलॉक. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.’ अशी टीका खासदार विखे यांनी केलीय.
राज्य सरकारचं ज्याप्रकारे मिस मॅनेजमेंट चालू आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. मात्र जर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असतं तर यापेक्षा चांगलीच परिस्थिती राज्याची असती.’ असे सुजय विखे यांनी बोलताना सांगितले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच आहे. आज दिवसभरात राज्यात 5537 रुग्णांची नोंद झाली आहे यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 298 पर्यंत पोहचली आहे.
काल दिवसभरात 2 हजार 243 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत एकूण 93 हजार 154 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 79 हजार 075 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
दिवसभरात 198 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 69 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 69, मीरा भाईंदर 26,
ठाणे मनपा 17, कल्याण डोंबिवली 4, जळगाव 3, पुणे 3, नवी मुंबई 1, उल्हास नगर 1, भिवंडी 1, पालघर 1, वसई विरार 1, धुळे 1 आणि अकोला 1 यांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews