Airtel वापरत असाल तर हे नक्की वाचाच ! कॉल रेट, SMS चे दर वाढले,ग्राहकांच्या खिशाला झटका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे.वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी टेलिकॉम कंपनी Airtel ने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झटका दिलाय 

एअरटेलने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कॉल रेटच्या किंमतीत वाढ केली असून रिचार्जच्या किंमती बदलून नवी किंमत लागू केली आहे.

तुम्हाला दरमहिन्यात एअरटेल नेटवर्क वापरता यावे यासाठी 45 रुपयांचा रिचार्ज करावाच लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे. यापूर्वी हा रिचार्ज 35 रुपयांचा होता.

याचा अर्थ आता ग्राहकाला दहा रुपये अधिक मोजावे लागणार आहे. ग्राहकांना जर कॉलिंग करायची असेल तर त्यांना कमीत कमी 1.50 रुपये प्रति मिनिट द्यावे लागणार. याचा अर्थ 2.5 पैसे प्रति सेकंद द्यावे लागणार.

त्यासोबतच एअरटेलने SMS चे दरही वाढवले आहेत. ग्राहकाला आता SMS साठी 1 रुपये आणि STD SMS साठी 1.50 रुपये द्यावे लागणार आहे.

यापूर्वी 4 डिसेंबर रोजी टेलिकॉम कंपनीने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत 40 टक्क्यांची वाढ केली होती. एअरटेलने केलेल्या ह्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणारा आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24