महाराष्ट्र

Baramukhi Waterfalls: 12 ठिकाणावरून वाहतोय खान्देशातील ‘हा’ एकच धबधबा! याच धबधब्यावरील प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार झाला होता शाहरुखचा स्वदेश चित्रपट

Published by
Ajay Patil

Baramukhi Waterfalls:- महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळांची रेलचेल असल्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाल तरी तुम्हाला कुठलेन कुठले पर्यटन स्थळ पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळांमध्ये गडकिल्ल्यांपासून तर हिल स्टेशन, पावसाळ्यामध्ये रौद्ररूप धारण करून वाहणारे धबधबे, थंड हवेचे ठिकाणे तसेच निसर्ग सौंदर्याने सजलेल्या दऱ्याखोऱ्या आपल्याला पाहायला मिळतात.

पावसाळ्यामध्ये तर अशा ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस तसेच वातावरणामध्ये पसरणारा आल्हाददायक गारवा आणि या सगळ्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये निसर्गाने पांघरलेल्या हिरवाईच्या अनुभव घेत केलेले पर्यटन मनाला मोहून टाकते.

पावसाळ्यामध्ये खरं पाहायला गेले तर सगळ्यात जास्त गर्दी ही धबधब्यांवर होत असते व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे असे धबधबे दिसून येतात व प्रत्येक ठिकाणी निसर्ग सौंदर्याने  नटलेल्या अशा ठिकाणांवर धबधबे असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आकर्षित होतात.

याच अनुषंगाने धरून आपण या लेखामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये बेलगाव येथील उदय नदीवर असलेला बारामुखी धबधबा हा खूप महत्त्वाचा असून या धबधब्यालाच बाराधारा या नावाने देखील ओळखले जाते.

 नंदुरबार जिल्ह्यातील बारामुखी धबधबा पर्यटकांना करतो आकर्षित

तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचा प्लॅनिंग असेल व तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत धबधबा पाहायला जायची प्लॅनिंग बनवत असाल तर तुमच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेला उदय नदीवरील बारामुखी धबधबा हा एक खास पावसाळ्यामध्ये पर्वणी ठरेल.

तुम्हाला माहिती नसेल की, शाहरुख खान याचा गाजलेला स्वदेश चित्रपट या धबधब्यावर जो काही प्रकल्प उभारण्यात आलेला आहे त्याच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. बारामुखी धबधबा हा वैशिष्ट्यपूर्ण असा धबधबा असून उंच कड्यावरून पडणाऱ्या या 12 पाण्याच्या धारा नर्मदा नदीला जाऊन मिळतात व त्याला हा धबधबा खूप आकर्षक आहेच

परंतु जीवघेणा देखील आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्याचा अंदाज घेऊनच या ठिकाणी पर्यटन करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या या बारामुखी धबधब्याचे एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बारा विविध ठिकाणावरून हा एकच धबधबा होतो व देशातील हा एकमेव अशा पद्धतीचा धबधबा असेल. म्हणजे एकच डोंगरावरून बारा ठिकाणावरून हा धबधबा कोसळतो.

अशा पद्धतीने कोसळणाऱ्या त्याच्या पाण्याचा प्रवाह रौद्ररूप धारण करतो.जेव्हा तुम्ही हा धबधबा पाहायला जाल तेव्हा डोंगराच्या उंच कड्यावरून जेव्हा बारा पाण्याच्या धारा खाली कोसळतात तेव्हा हा नजारा पाहण्यासारखा असतो व त्यामुळेच पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.

Ajay Patil