अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साध्या नाशिक जिल्ह्यातील एक थाळी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे, मखमलाबाद येथील हिंद केसरी हॉटेलातील ‘हिंदकेसरी थाळी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नाशिक हे मिसळप्रेमींसाठी म्हणून ओळखले जाते. तसेच अनेक खव्वयांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मखमलाबाद येथे हिंद केसरी हॉटेल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
कारण या हॉटेलात खास नॉन व्हेज प्रेमींसाठी एक खास थाळी तयार केली आहे. या थाळीची किंमत तब्बल पाच हजार रुपये आहे. त्यामुळे तुम्ही अव्वाक व्हाल पण याचबरोबर तुम्हाला एक ऑफरही देण्यात आली आहे.
जर आठ जणांनी मिळून हि थाळी संपवलीत तर तुम्हाला पुढील महिनाभर जेवण फ्री मिळणार आहे. विशेष म्हणजे जर तुम्हा आठ लोकांना ही थाळी संपली नाहीतर ५० रुपये दंड आकाराला जाणार आहे.
या थाळीत उकड सुप, ८ पापलेट, ८ सुरमई, २५ कोळंबी फ्राय, २० रस्सा कोळंबी, ८ चिकन लेग पिस, चिकन करी, सुके चिकन, सुके मटण, खिमा, ८ ज्वारीच्या भाकरी, ८ बाजरीच्या भाकरी, ८ तांदळाच्या भाकरी, १६ चपाती, २४ सागोती वडे, सोलकढी, झिंगा चटणी, कोळंबी रस्सा, खेकडा रस्सा आणि भात यांचा समावेश आहे.
दरम्यान या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी नाशिकर गर्दी करत असून यापेक्षा अधिक गर्दी थाळीला बघणायसाठी आलेल्या नागरिकांची दिसून येते आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा हॉटेल चालकांकडून करण्यात आला आहे.