अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे.
केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे.
विशेष :- हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे. नॅशनल परमीट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे १ ऑक्टोबर २०१९ पासून बंधनकारक केले होते.
🗣️ *मंत्रालयाचे म्हणने* : थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ बंधनकारक असेल.
📌 हे इंश्युरन्स सर्टिफिकीटच्या पाहणीवरून होईल, जिथे ‘फास्ट टॅग’ चा आयडी डिटेल्स पाहिल्या जाईल. हा निर्णय १ एप्रिल २०२१ पासून लागू होईल.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved