महाराष्ट्र

मतदान करताना चूक झाल्यास किंमत मोजावी लागेल – शरद पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : मोदी काळात सत्तेचा गैरवापर होत असून मोदींवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ते महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये घेऊन निघाले आहेत.

त्यामुळे आताची निवडणूक साधी सोपी राहील नसून चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ कांजुर मार्ग येथे घेतलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

यावेळी शिवसेना (ठाकरे) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार चंद्रकांत हांडोरे, काँग्रेस आमदार भाई जगताप यांची प्रमुख उपस्थिती होते. गेल्या दहा वर्षामध्ये सिलिंडरच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत.

२००९ साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी महिलांना मतदान करायला जाताना सिलिंडरला नमस्कार करून जाण्याचे आवाहन केले होते, याची आठवण करून देत शरद पवार यांनी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

देशात तरुण खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. मात्र भाजप या तरुणांना काम देण्याऐवजी महाराष्ट्रातील कारखाने, उद्योगधंदे गुजरातला पळवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Ahmednagarlive24 Office