जेव्हा आपण दररोजची धावपळीची जीवनशैली आणि तेच तेच दैनंदिन रुटीन याला कंटाळतो तेव्हा आपल्याला अक्षरशः याचा कंटाळा यायला लागतो. त्यामुळे दररोजच्या जीवनातील हा कंटाळवानणे पणा दूर करण्यासाठी बरेच जण छानसी पिकनिक आयोजित करतात. अशा पिकनिक या प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात.
या माध्यमातून बऱ्याचदा आपण विविध निसर्ग सौंदर्य पर्यटन स्थळांना भेटी देतात. अशा पिकनिक या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्लॅन केले जातात. अशाच पद्धतीने तुम्ही जर पुणे किंवा आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर तुमचा देखील निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक किंवा काही दिवस घालवण्याची इच्छा असेल तर तुम्ही पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या मढे घाटाला भेट देऊ शकतात.
मढे घाट म्हटले म्हणजे या ठिकाणी पावसाळ्यात नद्या तसेच धबधबे दुथडी भरून वाहतात व निसर्गाचा हा एक आविष्कार पाहण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आनंद मिळतो.
पावसाळ्यात मढे घाटाला भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद घ्या
पुणे शहरापासून साधारणपणे 70 ते 90 किलोमीटर एवढे अंतरावर हा घाट असून तुम्हाला जर पुणे या ठिकाणहून या घाटाला जायचे असेल तर बेंगलोर हायवेने तुम्हाला जाता येते. बेंगलोर कडे जेव्हा तुम्ही जायला निघतात तेव्हा चेलाडी फाट्यापासून उजवीकडून नसरापूर हुन पुढे वेल्हे गाठावे व वेल्ह्यांमध्ये मस्तपैकी चहा व नाश्ता करून मढे घाटावर प्रवेश करावा.
या ठिकाणाहून 17 किलोमीटर आंतर पार केल्यावर पुढे घाटाचा रस्ता सुरू होतो व रस्ता अरुंद वळणावळणाचा असून जे गाडी चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत तेच या ठिकाणी गाडी व्यवस्थित चालवू शकतात. त्यातल्या त्यात पाऊस सुरू असेल तर मात्र गाडी चालवणे आणखीन अवघड बनते. या घाटाचे एक ऐतिहासिक महत्त्व असून सिंहगडावर तानाजी मालुसरे यांना हौतात्म आल्यानंतर त्यांचा मृतदेह याच घाटाने कोकणात त्यांच्या गावी नेला गेला होता व याच वरून या गटाला मढे घाट असे नाव पडले असे म्हटले जाते.
ठिकाणी तुम्हाला 120 फुटांचा जलप्रपात अनुभवता येतो परंतु यामध्ये आपली काळजी घेत कुठल्याही प्रकारचा आगाऊपणा न करता निसर्गाचा आनंद शांततेत घ्यावा. मढे घाटाची सहल एक दिवसाची आहे. परंतु तुम्हाला मुक्काम करायचा असेल व सोबत वॉटर फॉल रॅपलिंग चा अनुभव घ्यायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात.
2- वरंधा घाट– ऐतिहासिक आणि निसर्गाच्या काही रत्नांपैकी वरंधा घाट देखील एक सुंदर रत्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वरंधा घाटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या घाटवाटेवरून दिसणारा नवरा नवरीचा डोंगर,रस्त्यावर सर्रासपणे जवळ येणारी माकडे, रस्त्यावर पडणारे धबधबे व सह्याद्री पर्वतरांगेच्या आल्हाददायक रूप तुम्हाला अनुभवता येते.
जेव्हा तुम्ही पुण्याहून पुणे बेंगलोर हायवेने भोरला पोहोचतात व त्या ठिकाणी महाड कडे जातात तेव्हा वरंधा घाट लागतो. या घाटातील प्रवास अतिशय थरारक असून अतिशय मन प्रसन्न करणार आहे.
या घाटाने तुम्ही कोकणात उतरून शिवथरघळ पाहू शकतात. शिवथरघळ एका धबधब्याच्या मागे डोंगरात असलेली एक नैसर्गिक गुहा आहे व त्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध याच घळी मध्ये बसून लिहिला. या घळी मध्ये समर्थांचे वास्तव्य दहा वर्षापेक्षा जास्त होते.