आत्मनिर्भर भारत घडवायचाय तर ‘हे’करा ; नितीन गडकरी यांनी दिला कानमंत्र !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत चा नारा दिला आहे. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल,” असे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॅालॅाजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरद्वारा आयाोजित वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते.

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी एसओएचडीच्या डॉ. जयश्री फडणवीस आदी सहभागी झाले होते.

यावेळी गडकरी म्हणाले कोरोनामधून सावरण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार आणि त्यासाठी मानसिकता बदलावी, हताश मजूरांमध्ये आत्मविश्वास जगविण्याची आवश्यकता आहे,

देशाचे भविष्य सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून असून मुल्यात्मक शिक्षणाच्या साथीने सर्वंकष विकास शक्य होईल. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेपुढे आव्हान तयार केले आहे.

देशाने आपली ताकद आणि आपल्यातील कमतरता ओळखून नियोजन करावे. देशात मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रारूप तयार करून अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू करावे लागणार आहे.

समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण यासह मजबूत सत्ताकारण निर्माण करून देशाला प्रगतीपथावर नेण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी मांडले.

अहमदनगर लाईव्ह 24