अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दि.१ जानेवारी रोजी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
त्या दिवशी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे दि.१ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमुळे यावर्षी अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरात येणाऱ्या समाजबांधवांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परिसरातील काही किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवारी अहमदनगर बाजूने पुण्याच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकणमार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण, शिक्रापूर दिशेने
तसेच खराडीमार्गे हडपसर, केडगाव चौफुलामार्गे शिरूरच्या दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात येणार आहेत.
तसेच पेरणे फाटा येथे अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांसाठी कोरेगाव भीमा, पेरणे फाटा येथून काही अंतरावर ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून स्वतंत्र बसची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.