अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे यंदा शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असली तरी ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आला आहेत. 2021मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच 15 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून 15 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी 5 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथून ऑनलाइन पत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क चलनाद्वारे 15 डिसेंबर ते 25 जानेवारीदरम्यान बँकेत भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी आणि प्री-लिस्ट चलनासोबत 28 जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची आहे.
या वर्षी नव्याने 17 नंबरच्या अर्जाद्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्याने त्या कालावधीत त्यांचे अर्ज भरू नयेत, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट के ले आहे.