अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. (MHADA Recruitment)
मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने आता पुन्हा एकदा मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता झालेल्या परीक्षेत घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षांमध्येदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्या कानावर आल्या होत्या,
पैसे देऊन पास होतील असे वाटत असेल तर चाळणी लावण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी आता जानेवारी महिन्यात दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला आळा घातला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो
म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. मात्र तुमचे कोणतेही काम मी होऊ देणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी या दलालांना या वेळी दिला.