अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली.महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन या झोनमध्ये केली आहे.

कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून, त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

रेड झोनमधील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यताआहे. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल.

त्याचप्रमाणे ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत.

दरम्यांन राज्य शासनाने अहमदनगरचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच असतील.

सध्या अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २७ असून तीन रुग्ण घरी सोडण्यात आले आहे, आठ रुग्ण परप्रांतीय व विदेशी आहेत. २७ मधून बारा वजा केले असता १५ रुग्णसंख्याच राहते. जे रुग्ण मुळचे नगर जिल्ह्यातील आहेत.

रेड झोन

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली

ऑरेंज झोन

कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा

ग्रीन झोन

नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24