अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोदी सरकारनं भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अॅपचा या यादीत समावेश आहे.
भारताने चीनच्या तब्बल ५९ मोबाईल ऍप्लिकेशनवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. भारताने बंदी घातलेल्या या ऍप्लिकेशन मधून भारतीयांच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
म्हणून या ऍप्लिकेशन्सवर भारताने बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या टिक टॉकचाही समावेश आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने हे पाऊल उचललं आहे. भारत-चीनमध्ये तणाव असताना मोदी सरकारने चीनवर हा एकप्रकारचा मोठा प्रहार केला आहे.
चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती.
या कंपन्या या Appsच्या माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे.या माहितीच्या आधारेच गेल्या काही दिवसांमध्येच चीनमधून सायबर हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं.
सरकारनं या ५९ अॅप्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. हे अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.ही यादी पुढीलप्रमाणे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews