अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यातच आता काही दिवसांवर दहावी तसेच बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या बुधवारपासून (दि.९) म्हणजेच आजपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी एकपासून हॉल तिकीट कॉलेज लॉगिनमधून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकिटाची प्रिंटआऊट काढावी. दरम्यान राज्य मंडळातर्फे ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जातील.
तत्पूर्वी श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होतील. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात परीक्षेची संधी उपलब्ध केली आहे.
आता परीक्षांच्या तारखा जवळ येऊ लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ देखील वाढली आहे. यातच कोरोनाची लाट अद्यापही कायम असल्याने या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित पार पाडणे याची मोठी जबाबदारी शिक्षण विभागावर आहे.