अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेले अनेक महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. या महाकाय संकटामुळे शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन कोलमडून गेले.
दरम्यान यामध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन केले, व परीक्षा घेतल्या देखील, मात्र यानंतर निकालावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षा निकालात काही विद्यार्थ्यांना शून्य गुण, कमी गुण दिल्याचे निदर्शनास आले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल 15 डिसेंबरपर्यंत जाहीर होणार असल्याचे परीक्षा विभागाने सोमवारी स्पष्ट केले.त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे निकालात त्रुटी राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्ष परीक्षा घेतली.विशेषत:- ऑनलाइन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होताच तांत्रिक कारणाने अनेकांना गैरहजर दाखवल्याचे समोर आले. तसेच शून्य व कमी गुण असेही मिळाल्याने विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न पडला होता.
कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे आपल्या तक्रारी व अडचणीही मांडली होती. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थी चिंतातुर झाले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved