महाराष्ट्र

सिनेप्रेमींसाठी महत्वाची बातमी ! सिनेमागृहे सुरु राहणार कि बंद?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून निर्बंधांमध्ये कठोरता आणते आहे.

यातच अनेक पुन्हा एकदा सिनेमागृहे देखील बंद होणार का? असा प्रश्न सिनेप्रेमींमध्ये पडला आहे. राज्यातील चित्रपटगृहे सध्या बंद करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र तिसरी लाट आणि त्याच्या तीव्रतेवर चित्रपगृहांचा निर्णय अवलंबून असेल.

येणाऱ्या काळात बाधितांचे प्रमाण आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण याचा विचार करून चित्रपटगृहांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील करोना परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबत आढावा बैठकीनंतर देशमुख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान करोनाची लाट लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा.

उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा याची दक्षता घ्यावी.

तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना देशमुख यांनी अधिष्ठाता आणि अधीक्षकांना दिल्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office