अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- इंधन दरवाढीने महागाईचा भडका उडण्याआधीच केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात करून ग्राहकांना दिवाळी भेट दिली. सरकारने पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे.
आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. आज मुंबईत पेट्रोल ५.८७ रुपयांनी तर डिझेल तब्बल १२.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र त्यासोबत राज्यातल्या जनतेसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पेट्रोल 6.25 रूपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहेत.
तर डिझेलचे दर 12.10 रूपयांनी कमी होऊ शकतात. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केल्यानं इंधनाच्या दरावरील राज्याचा कर आपोआप कमी होईल. त्यामुळे पेट्रोल सव्वा रूपयानं आणि डिझेल 2 रूपयांनी स्वस्त होऊ शकतं. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या केंद्राने करकपात केल्यावर गोव्यानेही इंधन करात कपात केलीय.
गोव्यात केंद्राच्या करांव्यतिरिक्त सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात 7 रूपये कपात केली. यामुळे गोव्यात डिझेल 17 रूपयांनी तर पेट्रोल 12 रूपयांनी स्वस्त झालं. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये झाला आहे.
त्याआधी बुधवारी डिझेलचा भाव १०६ रुपयांवर गेला होता. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके खाली आले आहे. चेन्नईत आज डिझेलसाठी ग्राहकांना ९१.४३ रुपये मोजावे लागतील. बुधवारी चेन्नईत डिझेलचा भाव १०२.५९ रुपये होता. कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये झाला आहे.
बुधवारी तो १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका होता. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपयांवरून ९५.४० रुपये झाला आहे. आज बंगळुरात डिझेल ९२.०३ रुपये आहे. बुधवारी ते १०४.५० रुपये होते.