अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे. याचं कारण म्हणजे अमूलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
1 मार्चपासून अमूलच्या दुधाचे दर वाढणार आहेत. ताज्या दरांनुसार, 1 मार्चपासून गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत अमूल गोल्ड 30 रुपये प्रति 500 मिली,
अमूल ताझा 24 रुपये प्रति 500 मिली आणि अमूल शक्ती 27 रुपये प्रति 500 मिली असेल. अमूलने दुधाचे दर वाढवल्याने आता
बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. दूध भुकटी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किमती वाढल्या आहेत.