अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील चांदबीवी महाल परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागातर्फे या परिसरात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर वन विभागाकडून योग्य त्या उपाय योजना ही करण्यात आल्या आहेत.
” शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम करू नये, तसेच शेतामध्ये मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणे लावणे, या प्रथम उपाय योजना शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे,
तसेच बिबट्या आढळून आल्यास तातडीने वन विभागाला कळवावे जेणेकरून वनविभागाला योग्य त्या उपाययोजना करता येतील असे सुनिल थिटे ( वनपरिक्षेत्र अधिकारी.नगर तालुका) यांनी बोलताना सांगितले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved