अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील.
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील.
प्राइस वॉटर हाऊस कूपर्सचे कृषितज्ञ अजय काकरा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, कांद्यावर साठा मर्यादा घातल्याने साठेबाजीला आळा बसेल. सामान्यपणे कुठल्याही वस्तूंचे दर वाढताच व्यापारी साठा करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे दर आणखी वाढतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved