अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यात होणारे चढ-उतार लक्षात घेता त्यांची चिंता योग्य असू शकते. पण नफ्याच्या बाबतीत अशा लोकांचे नुकसान होते.
स्टॉक मार्केट हे एकमेव ठिकाण आहे जेथे आपण आठवड्यात 60-70% परतावा मिळवू शकता.
एफडीमध्ये यासाठी आपल्याला बरीच वर्षे लागू शकेल. तथापि, शेअर बाजाराच्या रिस्क कडेही दुर्लक्ष करू नका आणि केवळ आर्थिक सल्लागार किंवा ब्रोकिंग फर्मच्या सल्ल्यानुसार निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी. स्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान.
अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.
योग्य शेअर्स निवडणे तसे सोपे नाहीये मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिले तर नुकसान टाळू शकतात. जाणून घ्या सविस्तर…
शेअर बाजाराची योग्य पद्धतीने माहिती घ्या, त्याचा अभ्यास करा –
शेअर बाजाराविषयी मूलभूत आणि पायाभूत ज्ञान नसेल, तर यामध्ये केलेली गुंतवणूक यशस्वी होऊ शकणार नाही. यासाठी तुमचा अभ्यास असणे गरजेचे आहे. अपेक्षित परतावा मिळण्यासाठी अभ्यास करून गुंतवणूक करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
गुणवत्ता तपासा –
गुंतवणूक करताना मजबूत शेअर्ससोबत जोडा जेथे ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त आहे. बाजारातील तज्ञ नेहमीच अशा शेअर्स संदर्भात माहिती देत असतात. कमी ट्रेड केल्या जाणाऱ्या शेअर्समध्ये बनावट तेजी आणली जाऊ शकते. तर, मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही शक्यता फारच कमी असते.
तोटा कमी कसा करायचा ते शिका –
शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्टॉप लॉस ठेवणे खूपच गरजेचे आहे. जर एखादा स्टॉक त्याच्या खरेदी किमतीच्या २० टक्क्यांहून खाली जात असेल तर त्याची विक्री करण्यातच शहाणपण आहे. या स्टॉकमध्ये एक दिवस तेजी येईल असा विचार करुन तो आपल्या पोर्टफोलिओत दीर्घकाळ ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
दीर्घकालीन गुंतवणूक –
जर तुम्ही मालमत्ता वर्गाचा विचार करत असाल, तर इक्व्हीटी ट्रेडिंग हा पर्याय अल्प काळासाठी नुकसानकारक ठरू शकतो. कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या विविध बाबींचा परिणाम इक्व्हीटी ट्रेडिंग वर होत असतो.
आर्थिक उद्दिष्ट्ये लवकरात लवकर सध्या करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करतात. मात्र तसे न करता कमी रकमेची दीर्घकालीन गुंतवणूक करणे कधीही सोयीस्कर असते.