अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पोहोचली. परंतु सुशांतची सुरवातीची कमाई २५० रुपये होती.
परंतु त्याने कष्टाच्या जोरावर खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळवला. त्याने चंद्रावरदेखील जमीन खरेदी केली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न होतं.
मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने आपली चंद्रावरील ही जागा दाखवली होती. ‘द माय साइड ऑफ मून #dreams’ असं कॅप्शन सुशांतने या फोटोला दिलं होतं.
नासाच्या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील आपल्या या ठिकाणी जाण्याची इच्छाही सुशांतने व्यक्त केली होती. सुशांतला नासाच्या 2024 च्या चांद्रमोहिमेत जायचं होती आणि त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली होती.
आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच सुशांतने आपलं जीवन संपवलं. बांद्रा इथल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews