अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यांनतर नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. जिल्ह्यातील गाव, वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला.
यातच सध्या नगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची डोके दुखी बनले आहे. एक जुलै रोजी तालुक्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला.
जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात बाधित सापडू लागले. ऑगस्टमध्ये तालुक्यात 273 कोरोनाबाधित झाले.
राहुरी तालुक्यात एक सप्टेंबरपासून रॅपिड चाचण्या सुरू झाल्या आणि जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या वीस पट वाढली. मागील 28 दिवसात 1368 नवे रुग्ण आढळले.
आता रुग्णसंख्या 1641वर पोचली. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात सलग तीन दिवस रोज 90 ते 100 रुग्ण आढळले. राहुरी तालुक्यातील 96पैकी 74 गावांमध्ये 1641 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांपैकी 1394 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved