अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार आपण नेहमीच पाहिले असतील. मात्र नेवासा तालुक्यातील भेंडा येथे चक्क अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले होते.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे असलेल्या भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची माहिती मिळावी या मागणीसाठी कुकाणा येथील
सामाजिक कार्यकर्ते मुकुंद तुकाराम अभंग यांनी नेवासा पंचायत समितीसमोर अर्ध नग्न अवस्थेतील एक दिवसीय उपोषण केले आहे. याबाबत अभंग यांनी विस्तार अधिकारी पंचायत समिती नेवासा यांना निवदेन दिलेलं आहे.
या निवेदनात म्हंटले आहे कि, 24 सप्टेंबर रोजी भेंडा-कुकाणा व सहा गावांचे पाणी पुरवठा योजने बाबत सविस्तर निवेदन दिले होते. परंतु अद्याप ही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसून नागरिक शुद्ध पिण्यापासून वंचित आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved