अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा भाजपमधील धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झालीय
अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला. निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता.
पण माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आलेल्या अडचणींविषयी प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते.
विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या 7 व्हायला हवी होती. मात्र प्रत्येक्षात ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे विखे फॅक्टर काहीही उपयोगी पडला नसल्याचे शिंदे म्हणाले. खुद्द शिंदे विधानसभेला पराभूत झाले आहेत.
निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय झाले हे आम्ही पक्षाला आधीच कळवले आहे. आता कारवाईची अपेक्षा असल्याचे राम शिंदे यावेळी म्हणाले.