अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण झाली. यानंतर सोमवारी (2 मार्च) रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
गुंडांना कायद्याचा धाक राहिला की नाही असाच प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. विरोधीपक्षांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. अखेर अहमदनगर तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याची दखल आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, यातील आरोपी हे या महिलेचे वडील, भाऊ, चुलत भाऊ, भाचा, महिलेचा दीर असे 8 आरोपी आहेत, यामध्ये घरची मंडळी आरोपी असली तरी आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
दरम्यान पीडितांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत याआधीही हल्ले झाले आहेत. २४ जानेवारीला पीडित दाम्पत्य शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन घरी जात होते. तेव्हा त्यांचं रुग्णालयाच्या बाहेरुनच अपहरण करण्यात आलं.
त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी एका बंदिस्त खोलीत विवस्त्र करण्यात आलं. त्यांच्याच कपड्यांच्या सहाय्याने त्यांना टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याचीही माहिती पीडितांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com