अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधानांची एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा झाली.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्याचे राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे. आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष वेधतो. महान लोकांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणाबद्दल आकस, आसूया न ठेवता महापुरूषांविषयी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा टोला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.
तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, राज्यात पहिली मेट्रो अंधेरीत झाली. नागपूरची मेट्रो आपल्याच शुभहस्ते २०१४ला भूमिपूजन झालं आणि २०१९मध्ये मेट्रो सुरू झाली.
पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली,
स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेड या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल असेही त्यांनी म्हटले.