संतापजनक घटना, कोरोना संशयीत युवतीचा गुप्तांगातून घेतला स्वॅब

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :-कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (३०, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून

तो बडनेरा चयेथील लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो. फिर्यादी २४ वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते.

मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील २० जणांचे २८ जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणार्या देशमुखने फिर्यादी मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. फिर्यादी तरुणीने सदर बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास कळविली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले.

त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली.

त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने तिने त्याबाबत भावाला सांगितले.

त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पंजाब वंजारी,पोलिस निरीक्षक याप्रकरणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अशा घटना कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही अशी प्रतिक्रिया महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24