कोरोना सारख्या संकट काळात महाविकासआघाडी सरकार अतिशय निष्काळजी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-महाविकास आघाडी सरकारने दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजप च्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना 50 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. महाराष्ट्र करिता विशेष आर्थिक पॅकेज घोषित करावेत. घर कामगार व बारा बलुतेदारांना आर्थिक मदत करावी.

आधारभूत किमती वर धान्य खरेदी चालू करावी. सरसकट संपूर्ण कर्जमाफी लागू करावी. वीज बिल माफ करावे. शाळेची फी रद्द करावी. शिधापत्रिका नसलेल्यांना धान्य द्या शिवाय साखर किराणा डाळ देण्यास सुरुवात करावी.

विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक यांच्या मोफत प्रवासाची सोय करण्यात यावी. खाजगी रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार करावेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे पैसे त्वरित द्यावे.

शेतकऱ्याला बी-बियाणे खते मोफत उपलब्ध करून द्यावी. तीन महिन्यांचे घरभाडे माफ करावेत. या मागण्यां यावेळी नागवडे यांनी मांडल्या.

यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, संदिप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, महिला अध्यक्ष सुहासिनी गांधी, दिपक शिंदे, संतोष क्षीरसागर, दत्ता जगताप, राजेंद्र उकांडे, दीपक हिरणावळे आदींसह भाजप चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24