Pune Metro : मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘रुबी हॉल ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले आहे. या नवीन मार्गांच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘वनाज ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होत आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून, अधिकतम भाडे ३५ रुपये आहे.
पुणे मेट्रोची ‘पीसीएमसी ते फुगेवाडी’ व ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गिकेवरील सेवेचा शनिवारी (दि. ५ ऑगस्ट) आणि रविवारी (दि.६ ऑगस्ट) जवळपास ९६ हजार प्रवाशांनी लाभ घेतला. तर दोन दिवसांत मेट्रोच्या तिजोरीत १६ लाख ४७ हजार रुपये जमा झाले आहेत.
‘पीसीएमसी ते वनाज’ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागत आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल. तसेच, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ यासाठी ३० रुपये भाडे आहे. ‘वनाज ते रुबी हॉल’ यासाठी ३५ रुपये भाडे आहे.
विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये ३० टक्के सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे मेट्रो कार्ड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्या आले आहेत. रोख, क्रेडिट-डेबि कार्ड, डिजिटल वॉलेट, मेट्रो अॅपद्वा तिकीट खरेदी करता येईल. तिकी खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन व्हॉट्स अॅप इत्यादी पद्धतीन तिकीट प्राप्त केले जाऊ शकते पीएमपीएमएलद्वारा फीडर बससेवेच लाभ उपलब्ध करून देण्यात आल आहे,
त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा तीन कोचची ट्रेन असून त्यातील एक डबा महिलांसाठी राखी आहे. दिव्यांगांसाठी मेट्रो कोचमध् विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानक व मेट्र कोचमध्ये इमर्जन्सी हेल्प बटण ठेवले आहे.