अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
केंद्र सरकार राज्याचं 38 हजार कोटी जीएसटी देणं आहे. विरोधी राज्याला आर्थिक त्रास कसा द्यावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच बजेट आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांवर आर्थिक लयलूट केली. महाराष्ट्राचं देणं देण्याची आवश्यकता होती. राजकीय हेतू समोर ठेऊन बजेट सादर झालं असून महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी निराशा जनक बजेटअसल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. शेतकऱ्यांची निराशा करणारा आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.