बिबट्यांचे मानवावर वाढते हल्ले चिंताजनक ! वन्य प्राण्यांमुळे मानवी वस्त्या असुरक्षित

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : जंगलांवर मानवाने अतिक्रमण केल्याने जंगली प्राण्यांना आसरा शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे प्रयाण करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येण्याची वेळ आली आहे.या वन्य प्राण्यांमुळे मानवी वस्त्या मात्र असुरक्षित होत असल्याचे दिसत येत आहेत.

सध्या जंगली प्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी शहरी भागातही बिबटे संचार करत असल्याचा घटना घडत आहेत.बिबट्यांचे अधिवास नष्ट होत असल्यानेच बिबटे मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवत आहेत.जंगलांमध्ये पाण्याची कमतरता तसेच अधिवासास असुरक्षित वाटल्यानेच बिबटे मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे दिसत आहे.

अनेक ठिकाणी बिबटे नैसर्गिक वास्तव्याचे ठिकाण सोडून मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळवत असल्याने भविष्यात हा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दिवसेंदिवस जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याने हे जंगली श्वापदे मानवी वसहतींकडे स्थलांतर करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हे जंगली प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर जीवित हानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

अनेक ठिकाणी या जंगली श्वापदानी माणसांवर हल्ले केले आहेत. त्यात अनेकजण जखमी तर काहींना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात लहान बालकांना मोठ्या प्रमाणात मुकावे लागले राहाता तालुक्‍यातील लोणी सादतपुर परीसरात बिबट्याने जवळपास महिना भराच्या अंतराने दोन बालकांचा जीव घेतला आहे.

या सर्व घटनांना जंगलातील माणसांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. आज ग्रामीण भागात महावितरणच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्याना रात्री पिकास पाणी द्यावे लागते. त्यावेळी या रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यास बळी पडावे लागते.

मागील आठवड्यात राहुरी तालुक्‍यातील चिंचोली येथेही एका शेतकऱ्यावर रात्री शेतात पाणी देत असताना बिबट्याने हल्ला केला.म्हणजे पिके वाचवायची तर रात्रीच्या वेळी पाणी द्या आणि या बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचावहीन करा, असे दुहेरी काम शेतकऱ्यांना करावे लागते.

वनविभाग शेतकरी अथवा ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर ठराविक ठिकाणी पिंजरा लावते आणि यदाकदाचित बिबट्या त्यामध्ये अडकला तर त्यास पकडून त्यास पुन्हा जंगलात सोडून देतात.

परंतु या निबट्यांना पकडल्यानंतर त्यांना जंगलात सोडून न देता त्यांच्या सुरक्षित अधिवसाची काळजी घेऊन हे बिबटे पुन्हा मानवी वस्त्यांकडे येणार नाहीत यावर कायमचा मार्ग कडून दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखला पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe