अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी सुरु असलेला संप 12 व्या दिवशी स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कृती समितीचे प्रतिनिधी संतोष कानडे यांनी दिली.(Minister Uday Samant)
दरम्यान महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार 18 डिसेंबर पासून महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींनी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासंदर्भात शासननिर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. तर राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून
कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासित केल्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्यांनी बेमुदत काम आंदोलन स्थगित केले आहे.त्यामुळे आता विद्यापीठाचे व महाविद्यालयीन कामकाज सुरळीत होऊ शकेल.