अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कृषी विधयेकावरून देशात धुमाकूळ सुरु आहे, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलने केली आहे. याच अनुषंगाने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल.
अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर पडणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल.
काय बंद? काय सुरु? जाणून घ्या रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबवलं जाणार नाही. लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद राहणार दरम्यान शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved