अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून भारत-ब्रिटन विमानसेवा स्थगित करण्यात आली होती.
काही विमानसेवा पुर्ववत होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील विमानसेवा 8 जानेवारी 2021 पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पुरी यांनी सांगितले की, 23 जानेवारीपर्यंत भारत आणि यूके यांच्यात आठवड्यातून केवळ 15 उड्डाणे भारतातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांत होतील.
कोरोनाचा धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानातल्या प्रवाशांना भारतात आल्यावर आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य आहे.
प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला विलगीकरणात रहावे लागेल.